कौशल्य.... कला जोपासण्याचे
प्रत्येक जण आपल्या आवडी-निवडी, वेगवेगळ्या कला जोपासत असतो. काही त्या कलेत अधिक निपुण असतात, तर काही एक विरंगुळा म्हणून कलेशी जोडलेले असतात. काही जण त्या कलेला कौशल्याशी जोडतात. तुमच्या अंगी वेगवेगळे कला, कौशल्य असतील तर 'रिकामं मन शैतानचे घर' असे कधीच होऊ देणार नाही. काहीच काम नसेल तर आपण कंटाळतो, जावं कुठे? करावं काय? असे मनात प्रश्न उद्भवतात. अशावेळी तुम्हाला कलेची आवड असेल.. जसे... वाचन, लेखन ,गायन ,चित्रकला , रंगकाम , फोटोग्राफी संवाद अशा अनेक कलांपैकी एक कला ज्याची तुम्हाला आवड असेल तर तुम्ही स्वस्थ बसणार नाही. तुमचा कंटाळा, रिकामा वेळ सहज भरून निघेल. कला जोपासणे हे ही एक कौशल्य आहे. बहुतेकदा खूप सार्या कला अवगत असतांना कामाच्या व्यापामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अशावेळी कधीतरी तुम्ही तयार केलेली वस्तु दिसली की तुम्ही त्या दिवसांत हरवून जातात. काय तो क्षण, काय ते दिवस असे विचार मनात घर करतात. कधीतर कलेत निपुण असतांना कौशल्यांच्या कमतरतेमुळे आपले कले कडे दुर्लक्ष होते. वेळ आणि अल्पश...