कथा - लघुकथा

 

चिमणी पाखरे  


लेखन : अरूणा क्षत्रिय (नाशिक )

         मल्हार साईटवरचे काम आटपून  गेस्टहाऊसवर परत चालला होता . सध्या त्याचे दुसर्‍या शहरात काम चालू होते . संध्याकाळ झाली होती मंद वारा वाहत होता रेडीओ वर छान गाणे लागले होते . आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे मल्हार पण गाणे गुणगुणत गाडी चालवत होता , इतक्यात त्याची नजर रस्त्याच्या बाजूला एका झाडाखाली उभ्या असलेल्या  वयस्कर जोडप्या कडे गेले ,  त्याने गाडीला ब्रेक लावला व गाडी थांबवली  खाली उतरून त्या जोडप्याकडे गेला , त्यांच्या पेहेरावा वरून दोघेजण चांगल्या घरातले दिसत होते . का कोण जाणे पण  त्यांना बघुन एक आपल्यात काही तरी अटुट नाते असावे असे त्याला जाणवले . मल्हार ने पुढे जाऊन व अदबीने त्यांना विचारले काका तुम्ही इथे काय करत

आहात ? संध्याकाळ होऊन गेली आहे . काका-काकू त्याच्या कडे आश्चर्याने बघतच बसले पण लगेच भानावर येऊन ते बोलले  आमची गाडी बंद पडली आहे , ड्रायव्हर गाडी घेऊन गेला आहे त्याच्यामुळे आम्ही इथे  थांबलो आहे,  मल्हार ने त्यांना विचारले मी आपल्याला सोडू का ?  आपण कुठे  राहतात ? तेव्हा काका बोलले आम्ही इथेच जवळच्या  गावात राहतो . मल्हार बोलला मी त्याच बाजूला चाललो आहे तर मी तुम्हाला सोडून देतो . काका काकू त्याच्यासोबत जाण्यास तयार झाले गावात शिरताच त्यांनी आपल्या घराचा रस्ता दाखवला जेव्हा घरासमोर गाडी आली व रखवालदाराने मोठे दार उघडले मल्हार ने गाडी आतमध्ये घेतली व तो बघतच राहिला . टुमदार बंगला , बंगल्या भोवती बगीचा होताआत मध्ये भरपूर  फुलझाडे , फळझाडे लावली होती. जाई जुई च्या मांडवा खाली मोठा झोपाळा टांगला होता . मल्हार ला त्या वेळी सुंदर गाणे आठवले , व  तो गुणगुणायला लागला .असावे घरटे अपुले छान पुढे असावे बाग बगीचा वेल मंडपी जाई जुई चा बंगल्याशेजारी एक मोठे हॉस्पिटल होते.  हॉस्पिटल ला त्यांनी विजय नाव दिलेले बघून मल्हार च्या डोक्यात एक विचार चमकून गेला आपल्या पण विजय चे असे जर हॉस्पिटल झाले तर त्याचा छोटा भाऊ विजय डॉक्टर होता व तो पण शहरात प्रॅक्टिस करत होता त्याचे पण छोटेसे हॉस्पिटल होते पण इतके छान टुमदार नव्हते . काकांनी त्याला आवाज दिला तसा तो भानावर आला . खाली उतरल्यावर काकूंनी त्याला घरात येण्यास आमंत्रण दिलेमल्हार त्यांना नाही म्हणू शकला नाही.  काही तरी एक अनामिक ओढ त्याला वाटत होती . घरात प्रवेश करण्याआधी काकूने त्याला घराबाहेरच उभे राहण्यास सांगितले व पटकन आत मध्ये कोणाला तरी आवाज देऊन  भाकरतुकडा व आरतीचे ताट आणण्यासाठी सांगितले ..  मल्हारला बाहेर उभे करून त्याच्या  वरून  भाकर तुकडा ओवाळला बाजूला टाकला व नंतर त्याचे औक्षण करून  आता घरात ये असे सांगितले . घराच्या आत प्रवेश करतात एकदम मन प्रसन्न झाल्यासारखे वाटले घरात नोकर चाकर यांची वर्दळ होती हॉलमध्ये येताच तो एकदम थबकला कारण. ..  समोरच्या भिंतीवर त्याच्या आईचा त्याच्या भावाचा विजय व त्याचा फोटो टांगलेला होता काका काकुंनी  पुढे येऊन त्याला घट्ट मिठी मारली त्याला काही कळत नव्हते काय चाललंय काकूच्या डोळ्यातून पाणी वाहत होते . हे काय आहे ?  त्याने  काकांना विचारले  . साश्रूनयनांनी त्याच्याकडेबघत काका बोलायला लागले , मल्हार बाळा तू व विजय आमचीच मुल॔ आहात व ते भूतकाळात गेले व मल्हार ला सांगू लागले तुझ्या व विजयच्या जन्मानंतर तुझी आई सुमन सतत आजारी पडत होती . त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यापासून तुम्हाला दूर ठेवण्यास सांगितले . त्यामुळे मला काहीच सुचत नव्हते की दूर मुलांना कुठे पाठवावे त्याच वेळेस सुमनने मला सुचवले . तिची बहीण लीला विधवा होती तिचा नवरा दारूबाज , तिला खूप त्रास द्यायचा एकदा दारूच्या नशेत एक्सीडेंट होऊन तो वारला नंतर तिने परत लग्न करण्यास विरोध केला कारण परत तेच आयुष्यात आले तर काय . 

तिचा मल्हार व विजय वर फार जीव होता त्यामुळे काका काकुंनी  तिला सुचवले की तू मल्हार व विजयची आई होऊन या दोघांना घेऊन शहरात जा , आम्ही तुला सर्व खर्च देत जाऊ . मुलांचे संगोपन तू तिथे कर व तू पण आनंदात राहा हे लीलाने मान्यकरून ती शहरात मुलांना घेऊन आली व त्यांच्या सोबत  राहू लागली. मुलांचे व्यवस्थित संगोपन केले . आईवडिलांच्या  प्रेमाचा वर्षाव लीला ने दोन्ही मुलांवर केला . आई वडिलांची कमतरता कधीच  भासू दिली नव्हती.  मुलं पण हुशार होती सर्व क्षेत्रात बक्षीस घेत होती , त्या मुळे  मल्हारला आर्किटेक विजयला डॉक्टर होण्यास काहीही अडचणी आल्या नाही.  दोघेही हुशार व संस्कारी होती . मोठयां बद्दल   त्यांच्या  मनात नेहमीच आदर असे .विजय पण सर्वाचा लाडका डाॅकटर  होता रुग्णांची आस्थेने चौकशी करून त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधायला .त्याची फी पण अगदी अल्प प्रमाणात असायची .त्या मुळेच तो सर्वांचा आवडता होता. 

 आता त्यांचे लग्नाचे पण वय होत आले होते . आजपर्यंत लीलाने मुलांना कधीच जाणीव होऊ दिली नाही कि ती त्यांची आई नाही . काकांनी मल्हार ला आवाज दिला बाळा , त्यामुळे मल्हार एकदम भानावर आला हे सर्वच त्याला  अविश्वसनीय वाटत होते पण घरातील फोटो बघून त्याला त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागला संध्याकाळ झालेली होती त्यामुळे आता बाळा तू कुठे जाऊ नको हे तुझेच घर आहे तू इथेच थांब असे काका व काकू त्याला आग्रह करू लागले . आज आपला मुलगा घरी जेवणा साठी पहिल्यांदाच आला आहे . त्या मुळे  सुमनने गोडा चे जेवण केले जेवण झाल्यावर गप्पांच्या नादात सकाळ कधी उगवली हे कळलेच नाही .काकू  मल्हार ला बोलल्या  अरे बाबा तू आता थकला असशील थोड्यावेळ तू झोपून घे . पण मल्हार  बोलला नाही मी आता झोपत नाही आता तर मला खूप काम करायचे आहे .  

त्याने मोबाईल हातात घेतला व विजयला फोन केला विजयला फोनवर बोलला विजय मी तुला एक पत्ता  देतो त्या पत्यावर  तु लगेच आईला घेऊन ये पण आईला यातले काहीच सांगू नकोस . मल्हार ने सांगितलेल्या पत्यावर  विजय आईला घेऊन आला , व जेव्हा आई व विजयने घरात प्रवेश केला तेव्हा  आई तर थक्कच झाली तिची  छोटी बहीण सुमन  समोर उभी होती दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली व त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.  विजयला हे काय होत आहे ते काहीच कळत नव्हते तो एकदम हक्का बक्का झाला होता . मल्हार ने आपल्याला इथे का बोलवले हे पण त्याने त्याला विचारले होते फक्त दादाने सांगितले म्हणून दादाच्या शंब्दासाठी तो इथे आला होता पण मल्हार ने त्याला समजावले अरे हे काका-काकू आपले आई वडील आहेत . आज त्यांच्याच मुळे आपण इतके मोठे इंजिनिअर डॉक्टर होऊ शकलो आहोत . 

विजय आज तुझ्या नावाचे हॉस्पिटल या गावात आहे आईआपल्याला नेहमी  सांगायची की चांगले कर्म करत जा व आपण तिला नेहमी पैसे देत जायचो त्याचा तिने किती छान विनयोग केला आहे बघ की आज ह्या  गावात तिने हॉस्पिटल बांधून गोरगरिबांसाठी एक चांगले हॉस्पिटल उभारले आहे . काका काकुंनी विजय ला घट्ट मिठी मारली व तिघांच्या ही डोळ्यातुन आनंदाश्रू गालांवर ओघळू लागले . सुमन ने पटापट सर्वाना पुरणपोळी चा स्वयपांक करण्याचे आदेश दिले.  व ते सर्व जण इतक्या वर्षापासून मनातल्या साठलेल्या  गोष्टी एकमेकांना सांगण्यात रंगून गेली. पान वाढली आहेत असा माजघरातून आवाज आला . उठावेसे वाटत नव्हते पण सर्व जण आत मध्ये आले बघतात तर काय आत मध्ये पाटं मांडले होते ,  केळीच्या पानांवर जेवण वाढत होते , पाना भोवती सुंदर रांगोळी , व लावलेल्या अगरबत्ती चा मंद मंद सुगंध वातावरण प्रसन्न करत होते . हे मल्हार व विजय ला नविनच होते . सर्व जण जेवायला बसले . यथेच्छ पुरणपोळीचा आस्वाद घेत जेवण आवरली . 

पान सुपारी घेऊन परत सर्व जण बगिच्यात येऊन बसले , कारण एव्हानासंध्याकाळ होऊ लागली होती . मल्हार  व विजय ला आपआपल्या गावाला जाणे गरजेचे होते . अगदी मनाविरुद्ध कारण घरातुन पाय निघत नव्हते , मन काका काकुंना सोडून जाण्यास तयार नव्हते ,  पण जाण्याशिवाय गत्यंतर नसल्या मुळे सर्वांनी जड अत: करणाने एकमेकांचा निरोप घेतला . व आपआपल्या  दिशेला निघाले , पण दर 15 दिवसांनी काका काकुं कडे येण्याचे आश्वासन देऊन . काका काकुं जड अत:करणाने घरात परतले . व काकु  गाणे गुनगुनु लागल्या  .

या चिमण्या नो परत फिरा रे घराकडे अपुल्या ......

Comments

  1. Wow well said maushi Kudos to you keep it up 😍

    ReplyDelete
  2. वा , छान ह्या क्षेत्रात पण कौशल्य आहे. अभिनंदन

    ReplyDelete
  3. Khup chan masta❤️

    ReplyDelete

Post a Comment