चारोळी

जीवन म्हणजे असते
अनुभवांची शिदोरी ...

काही खूपच सुखद
तर काही खूप काटेरी...

-दिप्ती दिग्रसकर
नाशिक 



शब्दांचेही बांध हलकेच कोसळावे , 
क्षणभर सारे स्तब्ध व्हावे, 
नकळत मी ग्रीष्मात सहावे , 
जैसे सरितेने सागरासी भेटावे.

संगिता चांदे 
नागपूर 



स्वप्नशिल्प नयनांचे 
देते आभास सुखानंदाचे 
दर्शनीय सारे भास इथले 
क्षण अमूर्त सोनेरी कोंदणाचे .

संगिता चांदे 
नागपूर 

Comments