कविता
पूर्ण झाली पाचशे वर्षांपासूनची प्रतिक्षा
श्रीरामाची आज प्राणप्रतिष्ठा होत आहे त्या निमित्त केलेली काव्यपुष्यांजली समर्पित...
आज पूर्ण झाली सर्वांची अपेक्षा
पाचशे वर्षांपासूनची प्रतिक्षा
श्रीरामाची आज होई अयोध्येत प्राणप्रतिष्ठा
औचित्य हे साधून दाखवू सकल रामनिष्ठा
घेऊ राम नाम आज सारे आपण
तेवढेच होईल आज त्याचे पवित्र स्मरण
आदर्शतचा तोच प्रतिक
मानती मर्यादा पुरुषोत्तम त्यास सकळीक
त्याचे मातृ पितृ बंधु प्रेम
त्याग वृत्ती अन् तेजस्वी पराक्रम
सर्व समावेशक आहे राम कथानक अशी कथा
रामायणाची सर्वांस उद्बोधक
सदा चित्ती चिंतावे रामनाम
जोवर आहे आपुल्या देहात राम
लीना अत्रे ( मुंबई )
सोमवार 23 जानेवारी 2024
-----------------------------------------------------
कसे सांगू मी सागरा, ...
माझ्या मनीच्या त्या कथा,
तुला असतील ना रे,
माझ्या सारख्याच व्यथा
तुझे असेल ना रे
प्रेम तुझ्या लाटेवरी
किती जपतोस त्याना
घेऊनियां तूच उरी
त्यांची घेतोस काळजी,
त्यांना घेऊनी कवेत,
असे भोवताली तुझ्या,
थंड गारवा ही हवेत
त्याच गारव्या सवे तो,
गाणे गाई तोचि वारा,
हळुवार देई तुला,
तोच प्रेमाचा इशारा
तोच इशारा प्रेमाचा,
कळतो ना रे मनाला,
तुझी प्रेमळ ती लाट ,
भिडते ना किनाऱ्याला
काय असतो सांग रे ,
त्यांच्या मधील संवाद,
हृदयाला भिडतो ना,
त्याच लाटांचा तो नाद
लाटांच्या त्या नादाला,
हृदयी मी साठवते
जीवनात आनंदाने,
फक्त त्यांना आठवते
ममता आंबर्डेकर
रत्नागिरी
-----------------------------------------------------
पूर आला पूर आला
पूर आला पूर आला नदी नाल्याना पूर आला [ध्रु.]
कित्येक वर्षानपासून काही नदीनाले कोरडे होते
पावसाल्यानंतर लगेच आटत होते
पाण्याची आस लागलेल्या नदीनाल्याना पूर आला
पाण्याची आस लागलेल्या नदीनाल्याना पूर आला
पूर आला [१]
पुरामुळे माणसांची घरे संसार वाहून गेली
झाडावरची चिमण्या कावळ्यांची घरे वाहून गेली
काय अवस्था माणसांची काय अवस्था पक्षांची
पूर आला पूर आला [२]
मुकी जनावरे दावणीला होती
माहित नाही त्यांना काय झाले
काहींचे प्राण वाचले असतील
काहीनी प्राण गमावले असतील यातदोष कोणाचा
पूर आला पूर आला [३]
नदी काठी नद्याना बंधन पडले
नद्यांचा ओघ बदलू लागले
ह्या मुक्या नद्यानी तरी काय करावे
अती वृष्टी मुळे बेफाम व्हावे
मानवानी काबीज केलेल्या
वस्तींमध्ये घुसावे
पूर आला पूर आला [४]
निसर्गा विरुध वागणाऱ्या सवयी मुळे
मानवाला ही शिक्षा भोगवीच लागणार
ह्या गोष्टीना थोडीच निसर्ग तारणार
नाही मदतीला ईश्वर धावणार
पूर आला पूर आला [५]
तहान लागल्यावर विहीर खोदणार
अती झाल्यावर दुसऱ्यांना दोष देणार
पण नेहमीच जागृत राहिल्यास
अशी आपत्ती थोडीच ओढवणार
पूर आला पूर आला [६]
लोकसंख्येला थोडातरी लगाम द्यायला हवा
निसर्गाला आव्हान देण्यास थोडेतरी थांबवावे लागेल
नाही तर असाच पाऊस येत राहणार
असाच पूर येत रहाणार
धरा जलमय होण्यास वेळ नाही लागणार
पूर आला पूर आला [७]
सौ अरुणा होसमनी [क्षत्रिय]
(नाशिक )
-----------------------------------------------------
आषाढी चे घन आले....
आषाढी चे घन आले
आषाढी चे घन
जल्लोष हा उरी अन
आनंदले मन
चिंता जीवाची या
निववली ही सारी
चालली अवघी ही
पंढरी ला वारी
भक्ती रसात न्हाले
इथे भक्त जन
आषाढ़ी चे घन आले
आषाढी चे घन
कुणी रंगे भजनात
कोणा ओठावर अभंग
जीवा सुखावती वेड्या
हे ताळ अन मृदूंग
धुंदले भक्ती रसात
अवघे तन मन
आषाढी चे घन आले
आषाढी चे घन
धुंदले मन वेडे
गीत त्याचे गात
ओढ ज्याला त्याला
भेटण्या त्यांचा नाथ
अंतरंग हळवे हे
भावनांचे तपोवन
आषाढी चे घन आले
आषाढी चे घन
आषाढी चे घन
जल्लोष हा उरी अन
आनंदले मन
चिंता जीवाची या
निववली ही सारी
चालली अवघी ही
पंढरी ला वारी
भक्ती रसात न्हाले
इथे भक्त जन
आषाढ़ी चे घन आले
आषाढी चे घन
कुणी रंगे भजनात
कोणा ओठावर अभंग
जीवा सुखावती वेड्या
हे ताळ अन मृदूंग
धुंदले भक्ती रसात
अवघे तन मन
आषाढी चे घन आले
आषाढी चे घन
धुंदले मन वेडे
गीत त्याचे गात
ओढ ज्याला त्याला
भेटण्या त्यांचा नाथ
अंतरंग हळवे हे
भावनांचे तपोवन
आषाढी चे घन आले
आषाढी चे घन
प्रांजला धडफळे
पुणे
-----------------------------------------------------
कर्दमाल्या या जीवा...
कर्दमाल्या या जीवा
विसाव्याची गरज आहे
जागल्या गर्दीत कधी
स्थैर्य हे शोधू पाहे
सुखासाठी झुरता झुरता
खूप झालं काम करून
अपेक्षांचे ठेऊन ओझे
एक दिवस जाऊ मरून
राबता जगी प्रत्येक
हित आपले साधू पाहे
कर्दमल्या या जीवा
विसाव्याची गरज आहे
पुरे झालं घर संसार
आणि हे मूल बाळ
रांधा वाढा उष्टी काढा
तो कधीच गेला काळ
रांधा वाढा उष्टी काढा
तो कधीच गेला काळ
भासतो ओला हळव्या
आठवणींचा गज आहे
कर्दमल्या या जीवा
विसाव्याची गरज आहे
कुठे तरी जावं लांब
रोजचा रहाट सोडून
एकांतात नातं कधी
निसर्गाशी घ्याव जोडून
धुंद एकांत अन
सुखाचे वारे वाहे
कर्दमल्या या जीवा
विसाव्याची गरज आहे
प्रांजला धडफळे
पुणे
-----------------------------------------------------
🌹~प्रेम~🌹
'प्रेम' किती सुंदर शब्द
नाजुक रेशमी धाग्या सारखा
कोवळ्या उन्हात बरसणाऱ्या
रुपेरी, चंदेरी धारांसारखा.....
कळी उमलते प्रेमाची
सहवासाच्या ओलाव्यात
अस्तीत्व असते प्रेमाचे
ह्रदयाच्या शांत गाभार्यात.....
अहो याला म्हणतात... ' प्रेम '
असं प्रेम दाखवता येतं का ?
मोगर्याच्या सुगंधाला
कधी मिठीत घेता येतं का.....?
शीतल वार्याची झुळुक
कधी डोळ्यांना दिसते का ?
अथांग नीळा सागर
कधी नजरेत सामावतो का.....?
अशीच असते प्रेमाची
खरी गंमत जंमत
एकमेकांच्या सहवासातच
प्रेम फुलतं हंसत खेळत.....
शब्दा विना स्पर्शातुनच
भाषा उमगते प्रेमाची ! अन्
'साद' ऐकु येते न घालताच
प्रेमात जीवाच्या जीवलगाची.....!
भारती ठकार
पुणे
-----------------------------------------------------
Khup chan
ReplyDelete