मराठी गीत
गणेश गीत
आला आला गजानन
अहंकार आणी दुर्गणांना कापरासारखे जाणून
करूया त्याचे षोडशोपचारे पूजन
भक्तीचे घालून तूप सद्भभक्तिची लावून वात
ओवाळू त्याला निरांजन
आला आला गणेश
घेऊन संदेश
निःस्वार्थपणे करा कर्म
करू नका द्वेष
आला आला गणाधीश
आता सुटतील संकटाचे पाश
करूया भक्तिचा अभिषेक
होऊ त्याच्यापुढे नतमस्तक
आला आला गणपती
चौसष्ट कलांचा अधिपती
करूया मत्रांचे पठण एकसंधता
गाऊया आरती
भक्तांची झोळी तो ठेवत नाही रिती
(Copyright @2023 Rama Harkare. All rights reserved)
Thane 400615
_____________________________________________
माऊली
वाचता माऊलीच्या कथा रसाळ
मनी उमले भक्तीचे कमळ
श्रवण करता माऊलीचे प्रार्थना स्तोत्र
वास्तू झाली माझी पवित्र
वाचता माऊलींची बावन्नी
जीवनात नक्कीच होणार उन्नती
गण गण गणात बोते करता जप
पूण्य लाभे केल्याचे तप
गाता माऊलीचे अष्टक
जीवनाचे झाले सार्थक
गाता मधूर गजाननाची आरती
भक्तांची ओजळ नाही राहत रिती
(Copyright @2023 Rama Harkare. All rights reserved)
Thane 400615
सुंदर
ReplyDeleteदोन्ही खूप छान
ReplyDelete