कौशल्य.... कला जोपासण्याचे
प्रत्येक जण आपल्या आवडी-निवडी, वेगवेगळ्या कला जोपासत असतो. काही त्या कलेत अधिक निपुण असतात, तर काही एक विरंगुळा म्हणून कलेशी जोडलेले असतात. काही जण त्या कलेला कौशल्याशी जोडतात. तुमच्या अंगी वेगवेगळे कला, कौशल्य असतील तर 'रिकामं मन शैतानचे घर' असे कधीच होऊ देणार नाही. काहीच काम नसेल तर आपण कंटाळतो, जावं कुठे? करावं काय? असे मनात प्रश्न उद्भवतात. अशावेळी तुम्हाला कलेची आवड असेल.. जसे... वाचन, लेखन ,गायन ,चित्रकला , रंगकाम , फोटोग्राफी संवाद अशा अनेक कलांपैकी एक कला ज्याची तुम्हाला आवड असेल तर तुम्ही स्वस्थ बसणार नाही. तुमचा कंटाळा, रिकामा वेळ सहज भरून निघेल.
कला जोपासणे हे ही एक कौशल्य आहे. बहुतेकदा खूप सार्या कला अवगत असतांना कामाच्या व्यापामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अशावेळी कधीतरी तुम्ही तयार केलेली वस्तु दिसली की तुम्ही त्या दिवसांत हरवून जातात. काय तो क्षण, काय ते दिवस असे विचार मनात घर करतात. कधीतर कलेत निपुण असतांना कौशल्यांच्या कमतरतेमुळे आपले कले कडे दुर्लक्ष होते. वेळ आणि अल्पशा मार्गदर्शनाच्या कमीमुळे आपली कला ब्रेक घेते. अशावेळी दुर्लक्ष न करता थोडासा सराव आणि वेळ द्या. सराव आणी आवडीमुळे कौशल्य आत्मसात होतील.
बहुतेकदा कलेचे प्रशंसक नसल्यामुळे ही कलेकडे दुर्लक्ष होते. पण प्रशंसक नसणे हा फार मोठा प्रॉब्लेम नाही. कला ही एक आवड आहे, जी आपल्या अंतर्गत गुणांचा खजिना आहे. जे आपल्याला जमतेय ते इतरांना जमत असेल का? यात ही एक सकारात्मकता ठेवा.
कलेतील कौशल्य अनेकांकडे असतात. फक्त हे कौशल्य वाढीस लावण्यासाठी इतरांपेक्षा वेगळे असावे लागते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शोधक वृत्ती, निरीक्षण कौशल्य, आवश्यक अभ्यासाचा वापर आपल्या कलेत करता येणे अतिशय गरजेचे आहे. तुमच्यातील कलेतील कौशल्य, संकल्पना तुम्हाला उत्कृष्टपणे मांडता येणे जास्त महत्वाचे असते. कारण केवळ चांगले ज्ञान असून चालणार नाही, त्यासोबत कौशल्यची गरज आहे. परीक्षेत चांगले गुण मिळतात परंतु कौशल्यांचा अभाव असल्याने जीवनात खच्चीकरण होते.
म्हणून आनंदासाठी का होईना कौशल्याची जोड द्या. मग पहा....
तुमचे वय काहीही असो, कलेची आवड असेल तर जोपासा. थोडसं कौशल्या पणाला लावा, थोडं मेहनत घेऊ शकत तर त्या क्षेत्रात करिअरही करू शकता. त्यातून कला जोपासलीही जाईल, आनंदही मिळेल.
तुम्हाला काय वाटते ?
कमेंटमध्ये आपले मत नक्की लिहा (कृपया अयोग्य अथवा विषयाला सोडून इतर कमेंट्स नयेत )
खुप छान कल्पना आहे... खरंच असा कलामंच असेल तर लिहिण्यासाठी स्फुर्ती येईल
ReplyDeleteधन्यवाद !
Deleteखुपच सुंदर
ReplyDeleteखूप छान उपक्रम
ReplyDelete