१२ मे - जागतिक परिचारिका दिन
दिनांक १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. परिचारिका व्यवसायांची सुरवात करणार्या “परिचारिकांची आद्यदेवता" म्हणून ज्यांचा अभिमानाने उल्लेख केला जातो त्या फ्लाॅरेन्स नाईटिंगेल यांचा आज जन्मदिवस आहे . १२ मे १८२० रोजी फ्लाॅरेन्स इटली येथे सुखवस्तु कुंटुंबात झाला असे असुनही दुसऱ्या महायुध्दात जखमी झालेल्या सैनिकांची सेवा केली , व पुढे परिचारिका प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण विभाग सुरु केले शास्त्रीय दृष्टिकोनातून परिचारिकांना व्यावसायिक शिक्षण मिळू लागले , पुर्वी सेवाभाव ही वृत्ती असणाऱ्या असंख्य महिला त्यासाठी पुढे आल्या व शिक्षण घेवू लागल्या , स्त्रीयांना शिक्षण व आर्थिक पाठबळ मिळाले , कालानुरुप त्यामध्ये बरेच बदल झाले , आणि परिचारिका व्यवसायास जगभर मान्यता मिळाली , पुढे अनेक विषयांतले शिक्षण त्यामधील डिप्लोमा; डिग्री, मास्टर डिग्री , अगदी डाॅक्टरेट पर्यंत प्रशिक्षण परिचारिका घेवु लागल्या आहेत ,
यावर्षी फ्लाॅरेन्स नाईटिंगेल यांच्या जन्मदिनाला २०० वर्ष पुर्ण होत आहेत म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने हे वर्ष “ परिचारिका वर्ष “ घोषित केले आहे , १ जानेवारीपासुन संपुर्ण जगभरात कॅन्डल मार्च किंवा विविध कार्यक्रमाना शानदार सुरवात झाली , पुर्ण वर्ष कार्यक्रम होणारं होते , दरवर्षी एक थीम घेवून पुर्ण वर्षभर त्या अनुषंगाने कार्यक्रम होणारं होते,
या वर्षांची १२ मे ची थिम आहे “ नर्स एक आवाजांचे नेत्तृत्व “ आरोग्यविषयक आव्हानांच्या विस्तृत श्रेणीने निराकरण करण्यासाठी परिचारीका किती महत्वाची आहे ( Nurses-A voice To Lead, Nursing the world to Health )
वरील थीमचा उपयोग नर्सिंग व्यवसायाला लगेच आपले नेतृत्व सिध्द करणाऱ्याची वेळ कोरोना या विषाणुने आणली ; जगभर या विषाणुने इतका धुमाकुळ घातला की , सारे जग हादरले , जगभर पसरलेल्या या आजाराने आरोग्य विभाग हादरला , जगभरात हाहा:कार माजवणाऱ्या या विषाणुंमुळे मृत्यूदर वाढला ,रुग्ण संख्या वाढली , आरोग्यसेवामधे प्रथमच परिचारिकांच्या सेवांची नोंद सन्मानानी घेतली गेली ; परिचारिका व्यवसायाला एकदम महत्व प्राप्त झाले , डाॅक्टरांच्या खांद्याला खांदा लावुन किंबहुना त्या पेक्षा जास्त कार्य परिचारिकांनी केले आहे ; कोरोना लढाईत त्या पुर्णपणे सज्ज होवुन उतरल्या आहेत सर्व शक्तिनिशी . प्रोटेक्टिव्ह किट अंगावर चढवणे व उतरवणे याला एक सिस्टीम आहे साधारण या प्रक्रियेला १५ ते २० मिनिटे लागतात ; त्याची किंमत ही जास्त आहे त्यामुळे एकदा घातली की ६ ते ७ तास व रात्रपाळीला १२ तास काढतां येत नाही , सध्या उन्हाळा चालु आहे सर्व आरोग्य योध्द्याच्या जीवाचे काय होत असेल,याचा विचार सर्व सामान्यांनी करावा असे मला वाटते , पाणी पिणे किंवा नैसर्गिक विधीला सुध्दा जाता येत नाही , नाहीतर पुर्ण किट बदलावी लागते . अतिशय कठीण परिस्थितीत काम करणे किती त्रासदायक आहे . स्वत: , कुंटुंब ,रुग्ण व समाज या सर्व पातळ्यांवर आज परिचारिका काम करत आहेत , संभाव्य कालात त्यांना लागण होणे किंवा इतर आजार उद्भवण्याचे परिस्थिती ओढवु शकते ,
मुळात परिचारिकां व्यवसाय हा ९०% स्त्रीयांचा आहे त्यामुळे कुटुंब व सेवा या दोन्ही आघाडयांवर परिचारिका अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत , सुरक्षित प्रसुती ते वयोवृध्दांची रुग्णसेवा त्या अतिशय काटेकोरपणे करत आहेत .
परिचारिका प्रशिक्षण हे १२ वी पास प्राधान्याने सायन्स विषय घेतलेल्या विध्यार्थाना ॲडमिशन दिली जाते . शिक्षणासोबत सेवा करण्यासाठी ही त्यांना कार्यरत रहावे लागते . व्यवसायायाची नीतीमुल्ये जपावी लागतात समवयस्क मित्रमैत्रिणी कट्ट्यावर बसुन गप्पा मारतात तेव्हा विद्यार्थी सेवा करत असतात प्रचंड मानसिक तणाव,. नोकरीची अनिश्चितता असुनही परिचारिका विद्यार्थिनीं “रुग्णसेवा ही ईश्वर सेवा “ मानुन करत आहेत .
यानिमित्ताने मी कांही अडचणी मांडत आहेत कोरोना युध्दात ज्या परिचारिका व्यवसायांचे एवढा उदोउदो होत आहे त्या विभागातील , वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग , आरोग्य विभाग , महानगरपालिका , यांतील सर्व वरिष्ठ पदे कित्येक वर्षापासुन रिक्त आहेत , शिक्षक , अधीसेविका , परिसेविका , उच्चस्तरीय डिप्लोमा , डिग्री , घेतलेल्या परिचारिकांना प्रमोशन नाही . त्यामुळे परिचारिकांना परिचर्या करण्याबाबतचे , ड्युटीबाबत मार्गदर्शन करणारे कोणी नाही . परिचारिकांचे असंख्य प्रश्न व मागण्या अनेक वर्षापासुन प्रलंबित आहेत . सध्यस्थितीत अपुरे मनुष्यबळ यामुळेच परिचारिकांच्या वर कामांची ताण येत आहे , रेल्वेसेवा , बससेवा, रिक्षा नसल्याने कामाच्या तासापेक्षा प्रवासाचे तास जास्त होत आहेत , तरीही कोरोना युध्दात जीवाची बाजी लावुन लढत आहेत . इंडीयन नर्सिंग कौन्सिलच्या नियमाप्रमाने परिचारिकांची पदे त्वरित भरावीत . व्यवसायांची शान उंचावण्यासाठी सर्व परिचारिका आज योध्द्याप्रमाणे लढत आहेत , काम करत आहेत ,
यानिमित्ताने ग्रामीण भागांत कार्यरत असलेल्या परिचारिकांच्या व्यथां अतिशय गंभीर आहेत एक परिचारिका अनेक आजारासाठी सेवा देत असते , माता बाल संगोपनापासुन ते अनेक साथरोग आजारात ग्रामीण भागातील परिचारिकांचा सहभाग आहे .अनेक आजार समूळ नष्ट करण्याकरिता ऊन, पाऊस , आजार , कशाचीही तमा न बाळगता ग्रामीण भागातील परिचारिकांनी काम केले आहे त्यासाठी त्यांचे योगदान मोठे व कौतुकास्पद व गौरवास्पद आहे .
या निमित्ताने मी सरकारला एवढे सांगु इच्छित आहे
1. परिचारीकांना स्वतंत्र संचलनायल हवे
2. सर्व विभागातील नर्सेस ची पदे त्वरित भरावीत
3. परिचारीकांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करुन घ्यावी.
4. उच्च शिक्षण घेतलेल्याना त्वरित सेवाबढती ध्यावी .
5. ठराविक मुदतीनंतर पदोन्नती ध्यावी .
6. परिचारिकांना सेवा अंतर्गत प्रशिक्षण ध्यावीत.
7. ग्रामीण भागातील परिचारिकांची पदे कायम स्वरुप भरावीत .
8. ग्रामीण भागातील परिचारिकांना संरक्षण मिळावे .
9. सेवेच्या ठिकाणी साधन सामुग्री उपलब्ध व्हावी.
परिचारिका दिनाचे औचित्य साधून राज्य , देश, व परदेशातील सर्व परिचारिकांना मन:पुर्वक शुभेच्छा !
कोरोना युध्दाच्या कथा जेव्हा लिहील्या जातील तेव्हा परिचारिकांच्या योगदानाची सुवर्ण अक्षरात नोंद होईल .
आकांक्षा पांडे
उपाध्यक्ष , ट्रेन्ड नर्सेस असो.ॲाफ इंडीया , महाराष्ट्र राज्य
ठाणे
Comments
Post a Comment